सिल्लोड, (प्रतिनिधी) तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवैध वृक्ष तोड होत असून, संबंधित शासकीय अधिकारी कारवाई करीत नसल्याने लाकूड तस्करांना रान मोकळे झाले आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील पिंपळदरी, भराडी, जांभई, अंभई, बोरगाव, घाटनांद्रा, केळगाव, आमठाणा, चारनेर, वांगी, मोढा आदी गावांच्या परिसरातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीत विविध जातीची अनेक झाडे कापली आहेत. कडूनिंब आणि आडजातीच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कटाई होत असून, कटाई केलेला माल मालवाहू गाडीने बिनधास्त शहरातील काही आरामशीनवर नेला जात आहे.
महसूल, वन विभाग व पोलिस खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कारवाई होत नसल्याने वृक्ष कटाई करणाऱ्यांचे फावत असून, त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही, अशी चर्चा नागरिकांत होत आहे. वृक्ष कटाईच्या या व्यवसायात शहरातील अनेक जण सहभागी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लाकूडतोडे सकाळपासून जंगलातील झाडे शोधून कापण्याचे नियोजन करीत असतात. या लाकूड तस्करांचे संबंध वन विभाग व महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील वृक्ष कटाई चा माळ दिवसा ढवळ्या नेला जात आहे. एकंदरीत या प्रकारामुळे महसूल वन विभागाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवैध वृक्षतोड करणारे काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून अनेक वेळा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
-- मध्यरात्री चालते झाडांची कटाई --
शेतातील झाड तोडत असताना अनेक वेळा शेतकरी या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाहून शेतातून पळून जातात. त्यामुळे त्यांची मनसुबे वाढत चालले आहे. हे लोक मध्यरात्री झाडांची कटाई करत असून सूर्योदय होण्यापूर्वी त्या वृक्षां सह शहरात दाखल होतात अशी माहिती आहे. यासंदर्भात वन विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क
साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
-- आरा मशीनवर तपासणी आवश्यक --
वन विभाग तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागातील आरामशीनवर येणाऱ्या लाकडांची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यात सर्रास सुरू असलेल्या या अवैध वृक्षकटाईबाबत वन व महसूल विभागाने किती कारवाया केल्यात याबाबतही तपासणी केली जाणे आवश्यक
आहे.
-- छापा टाकून गोमांस व जिवंत वासरे जप्त --
तालुक्यातील बोरगाव सारवणी येथील दोन कत्तलखान्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी सकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास छापा टाकून गोमांस व जिवंत वासरे जप्त केले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बोरगाव सारवणी येथे दिनांक १९ मे मंगळवारी सकाळी दोन ठिकाणी चालू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापे टाकले. या वेळी कसईवाडा येथे ८० हजार किंमतीचे गोंवश मास व साहित्य जप्त केले. त्याच बरोबर दुसऱ्या ठिकाणी मेहरुण मशीद जवळ पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून दीड लाख रुपये किंमतीचे गोंवश मास व चार जिवंत वासरे २० हजार रुपये किंमतीचे व या साठी लागणारे साहित्य जप्त केले.
सिल्लोड ग्रामीण गुन्हा पोलिसांत गुन्हा दाखल :
या प्रकरणी विनोद भगवान सरोदे पोका पो. स्टे. सिल्लोड ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण आरोपी नाजीम रशीद कुरेशी रा. बोरगाव सारवणी ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसऱ्या कारवाईत बबन विठ्ठल ढोके यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण आरोपी जाबिर बिलाल शेख, जुबेर जाबिर शेख व कदीर बिलाल शेख सर्व राहणार बोरगाव सारवणी यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजय आगे, अमोल रोकडे, पो हे कॉ सचिन काळे, विष्णू कोल्हे, विनोद सरोदे, यतिन कुलकर्णी, तायडे, व्यवहारे, जाधव यांनी केली.












